लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाच्या अंतिम वर्ष सत्राच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियाेजन फसले हाेते. त्यानंतर विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला हाेता. तसेच ५ नाेव्हेंबर पर्यंत गुण पाठवण्याची सुचना महाविद्यालयांना करण्यात आली हाेती. ८ नाेव्हेंबरपर्यंत अंतिम वर्षांचे निकाल अपेक्षीत हाेते. मात्र, अजुनही निकाल लागेलेले नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियाेजन केले हाेते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे विद्यापीठाला या परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थी परीक्षा देउ शकले नसल्याने त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे अंतिम वर्षाचे निकाल लांबणार आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. महाविद्यालयांकडून गुण आल्यानंतर विद्यापीठ निकाल जाहीर करीत आहेत. विद्यापीठाने सहा दिवसात ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळणार बम्पर गुण महाविद्यालय स्तरावर झालेल्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अर्धेच प्रश्न साेडवायचे हाेते. त्यामुळे , विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणार असल्याने यंदा अंतिम वर्षांच्या विद्याथ्यांना बम्पर गुण मिळणार आहेत. तसेच निकालही फुगण्याची शक्यता आहे.