एकमेव अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली. या केंद्रांतर्गत १ मे ते ७ मे या कालावधीत तब्बल ८२८ जणांनी ऑनलाइन नोंदणी करून लस घेतली आहे़
लस घेण्यासाठी तरुणांमध्ये उत्सुकता दिसून आली.
ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षावरील नागरिकांना सुरुवातीलाच लस देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गिते यांनी ग्रामीण भागात वाढत असलेले काेराेना रुग्ण पाहता लसीकरण महत्त्वाचे असल्याचे सांगितले़ प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा अंतर्गत वय १८ ते ४४ गटामधील लसीकरण सुरु करण्यात आले आहे़ अंढेरासह पाडळी शिंदे, सावखेड नागरे, मेंडगाव, बायगाव बु., शिवणी आरमाळ, पिप्री आंधळे, धोत्रा नंदई, देऊळगाव महीसह तालुका स्तर देऊळगावराजा येथून महिला व पुरुष लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येत आहे. नागरिकसुध्दा लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. सगळीकडे वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता लसीकरण उपाय म्हणून नागरिक मोठ्या संख्येने लस घेत आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा गांताडे, गट प्रवर्तक स्वाती वायाळ, संगीता पर्हाड......., सुनीता गवई, अलका वाघ, आशा सेविका मदत करतात. या केंद्रावर निरीक्षण कक्ष, नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, उभारण्यात आले असून फिजिकल डिस्टन्सिंग, हॅण्ड सॅनिटायझर,तसेच मास्कचा नियमितपणे वापर करण्यात येताे़ परिसरातील ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गिते यांनी केले आहे.