अंढेरा शिवारातील गट नं. ४१३ मधील स्वत:च्या शेतात बऱ्याच दिवसांपासून ते राहत होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे विहिरीला मुबलक पाणी आलेले आहे. सोबतच शेतात दलदल झाल्याने हाताशी आलेले पीक खराब होऊ नये म्हणून त्यांनी विहिरीतील पाणी उपसून टाकण्यासाठी मोटरपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार गणेश हिवरकर यांनी बीट जमादार गजानन वाघ, पोलीस कर्मचारी ऐहसान सय्यद यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघ हे तपार करीत आहेत.
280821\img-20210828-wa0289.jpg
फोटो मृतक प्रभाकर कडुबा तेजनकर