लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, असा आरोप माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी महिला व बालकल्याण विकास अधिका-यांकडे केला आहे. साखरखेर्डा येथे १७ अंगणवाडी असून, क्रमांक ६ मधील अंगणवाडी ही भोगावती नदीकाठी समाज मंदिरात भरते; परंतु त्या अंगणवाडीत सेविका कधीच हजर राहत नाही. या अंगणवाडीसंबंधी माहिती मिळावी म्हणून माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी माहितीच्या अधिकारात सिंदखेड राजा बाल विकास प्रकल्प अधिकाºयांकडे माहिती मागितली; परंतु त्यांना अद्याप कार्यालयाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. १ मार्च रोजी जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षकाकडून ० ते ३ आणि ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या पोषण आहारसंबंधी माहिती घेण्याचे आदेश दिले होते; परंतु स्थानिक शिक्षकांनी अवघ्या काही मिनीटात अहवाल तयार केला. ० ते ३ वयोगटातील बालकांना कोणत्याही प्रकारे पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली. उलट तक्रारकर्त्यांचीच दमदाटी करण्यात आली. क्रमांक सहाच्या अंगणवाडी सेविकेच्या घरातून मागच्या बाजूला पोषण आहाराचीच पाकिटे आढळून आली. त्यामुळे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी क्रमांक ६ या अंगणवाडीची चौकशी करावी, अशी मागणी माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी महिला व बालकल्याण विकास अधिकाºयांकडे केली आहे.
अंगणवाडीतील पोषण आहार सेविकांच्या घरी! बालके पोषण आहारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:07 AM
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, असा आरोप माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी महिला व बालकल्याण विकास अधिका-यांकडे केला आहे.
ठळक मुद्देमहिला, बाल विकास अधिका-यांकडे तक्रार