लोकमत न्यूज नेटवर्कअंजनीखुर्द : येथील अंगणवाडी क्र.४0/३ च्या इमारतीच्या मधल्या भिंतीला ८ ते १0 महिन्यांपासून दोन मोठमोठे तडे गेले आहेत. यामुळे ही इमारत मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. या अंगणवाडीच्या सेविका कुसूम मिसाळ, तर मदतनीस साठे ह्या आहेत. या अंगणवाडीमध्ये 0 ते ६ वयोगटातील ४९ मुले व ५0 मुली असे एकूण ९९ बालके शिक्षण व पोषण आहार घेण्यासाठी येतात. परंतु अंगणवाडीच्या भिंतीला तडे गेल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांंच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीच्या तडा गेलेल्या भिंतीचे काम वरिष्ठांनी दखल घेऊन लवकर न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशी केली असता कुसूम मिसाळ यांनी सांगितले, की वरिष्ठांकडे भिंतीला गेलेल्या तड्याबाबत माहिती दिली आहे.
अंगणवाडीच्या भिंतीला तडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2017 9:39 AM