शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:54 PM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसाने जिल्हाभरात सुमारे ४१७ कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. परंतू नुकसानावर जाहीर केलेल्या मदतीबाबत जिल्हाभर खंत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींसह पक्ष, विविध संघटना, शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत. मदत वाढवून देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातून राज्यपालांपर्यंत निवेदने दिली जात आहेत. परंतू मदतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी यासह भाजीपालावर्गीय पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. या दोन्ही महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. या नुकसानानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. पुढे हा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल, या शेतकºयांच्या नजरा लागल्या होता. दरम्यान, शनिवारी नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. राज्यपालांनी घोषीत केलेल्या या मदतीवर जिल्हाभरातून वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. मदतीत वाढ हवी, यासाठी शेतकºयांसोबतच विविध पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. राज्यपालांपर्यंत निवेदने पाठविण्यात येत आहेत. जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपूंजी असल्याने या मदतीमध्ये वाढ करण्याबाबत जिल्हाभरातून मागणी होत आहे.संघटना आक्रमक पावित्र्यातअतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतीला लागलेला खर्च भरून निघणारी सुद्धा नाही. त्यामुळे या मदतीमध्ये ताताडीने वाढ करण्यात यावी, यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकºयांसह विविध संघटनाही आक्रमक पावित्र्यात आहेत. यासंदर्भात राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट राज्यपालांच्या भूमिकेवरच ताशेरे ओढले आहेत. जिल्ह्यातील अखिल भारतीय सरपंच परिषद, शेतकरी संवेदना परिषद व विविध लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्वाधिक नुकसान मेहकर तालुक्यात जिल्ह्यात एकूण नुकसान ६ लाख ९० हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर झालेले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे मेहकर तालुक्यातील आहे. मेहकर तालुक्यात मेहकर ८२ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील ५७ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात ८० हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावरील ५५ कोटी ७२ लाख एक हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी