अमडापूर : कव्हळा धरणामध्ये पाणी उपलब्ध असताना अमडापूर गावासाठी सोडण्यात येणारे पाणी दूषित व पिण्यायोग्य नाही, शिवाय बाराव्या दिवशी पाणी सोडल्या जात असल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात जाऊन कार्यालयात मडके फोडले. आम्हाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी या महिलांनी केली. यावेळी महिलांनी सरपंचाला धारेवर धरून निवेदन सादर केले. कव्हळा धरणामध्ये व आजूबाजूला भरपूर पाणीसाठा उपलब्ध असताना अमडापूर गावाला नळ योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित व पिण्यायोग्य नाही. हे पाणी स्वच्छ करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या महिलांनी केली. सरपंच, सचिव हा प्रकार उघड्या डोळ्याने पाहूनही दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय बाराव्या दिवशी पाणीपुरवठा केल्या जात आहे. हा प्रश्न ग्रा.पं. पदाधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने महिलांनी २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता घागर मोर्चा काढून ग्रा.पं. कार्यालयामध्ये ठिय्या मांडला. तसेच सरपंचासमोर सोबत आणलेले मडके फोडून निषेध व्यक्त केला.
संतप्त महिलांनी फोडले मडके
By admin | Published: December 28, 2014 12:29 AM