डॉक्टर्स दिनानिमित्त एबीपी माझातर्फे कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. ज्यामधे रुग्णांची अत्यंत माफक दरात सेवा तसेच ऑक्सिजन व औषधांची उपलब्धता, कमी मृत्युदर अशाप्रकारे बऱ्याच गोष्टींची तपासणी करून संपूर्ण महाराष्ट्रामधून २० डॉक्टर्सची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यामधून मेहकरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिलकुमार गाभणे यांची निवड झाली व विशेष बाब म्हणजे या सेवेबद्दल महाराष्ट्रामधून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. एबीपी माझातर्फे त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. अनिलकुमार गाभणे यांचा भूषणभैय्या देशमुख यांनी माळी सेवा समिती व सत्यजित परिवाराच्यावतीने व श्री शिवाजी शिक्षण संस्था मेहकरच्यावतीने सत्कार केला.
यावेळी सत्यजित परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश मुंदडा, सत्यजितचे महाव्यवस्थापक घनश्याम जोशी, चंद्रशेखर जोशी, धीरज खंडेलवाल उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर यांनीही डॉ. अनिलकुमार गाभणे यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळुकर, डॉ. सुनील भराडे, केशव गिऱ्हे, डिगांबर गिऱ्हे, अरुण गिऱ्हे, व डॉ. सुमित गिऱ्हे उपस्थित होते. (वा.प्र.)