खामगाव : फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ यांसारख्या कादंबरीतून व साहित्यातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी उपेक्षित, दलित, वंचित समाजातील नायक उभे केेले असल्याचे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश चौथाइवाले यांनी व्यक्त केले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फाेरम अंतर्गत साहित्य संमेलन आयोजन समितीद्वारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृहात दि. १८ फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार)चे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, माधवराव कांबळे, बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स गजेंद्र बोरकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, ज्ञानदेव मानवतकर, साहित्यिक बाळकृष्ण सरकटे, साहेबराव पाटोळे उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सुरेश चाैथाइवाले तसेच पाहुण्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमापूजन तसेच दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी माधवराव पाटील यांनी अशाप्रकारच्या संमेलनांचे आयोजन वारंवार करायला हवे. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहू अशी ग्वाही दिली.
प्रास्तविक शालीग्राम मानकर यांनी केले. गजेंद्र बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन मुकूल पारवे यांनी केले.