अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासम गवळी होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, नगरसेवक पंकज हजारी, ललित इन्नानी, नीलेश मानवतकर, संजय ढाकरके, नीलेश सोमण, अलियार खान, माजी नगरसेवक गजानन जावळे, हबीब बागवान, ॲड. किशोर धोंडगे, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, ॲड. गजानन लांडगे, विजू म्हस्के, विकास पवार, शेरू कुरेशी, समाधान साठे (लहुशक्ती प्रदेशअध्यक्ष) हे होते. या प्रसंगी पंकज हजारी यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. शेवटी अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र माने यांनी केले.
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे- कासम गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:22 AM