श्याम उमाळकर यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या महान शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करून सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून ॲड. अनंतराव वानखेडे यांनी याप्रसंगी आजचा हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो असे उद्गार काढले. याप्रसंगी प्रास्ताविक मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कलीम खान यांनी, तर भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, मेहकर-लोणार माळी सेवा समितीचे अध्यक्ष भूषण देशमुख यांनी समायोचित भाषणे केली.
याप्रसंगी सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर, प्रा. डी. जी. गायकवाड, सेवादलाचे तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख, एनएसयूआयचे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, युवा नेते नितीन तुपे, रवी मिस्कीन, ॲड. गोपाल पाखरे, किशोर गवई, रियाज कुरेशी, छोटू गवली, आशिष बापू देशमुख, पत्रकार उद्धव फंगाळ, मुनाफ खान, योगेश अवगळे, जाकीर बागवान,एडवोकेट सी. वाय. जाधव, ॲड. एन. पी. जाधव, तारीक खान, नारायण इंगळे, धर्मा बनचरे, शाहूभाई गवली, आकाश अवसरमोल, आफताब कुरेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष युनूस पटेल यांनी केले, तर आभार प्रा. संजय वानखेडे यांनी मानले.