बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सलग दुसऱ्या दिवशी १०० पेक्षा जास्त रूग्णांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. साेमवारी जिल्ह्यातील १२९ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला असून ३० जणांनी काेराेनावर मात केली आहे. ३०५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये बुलडाणा शहर २४, बुलडाणा तालुका : अजिसपूर १, दे. राजा तालुका आळंद २, मेहुणा राजा १, पिंपळनेर २, दे. राजा शहर : ५, खामगांव शहर १२, शेगांव शहर १२, शेगांव तालुका गायगांव बु ३, जानोरी २, चिखली शहर २३, चिखली तालुका सोमठाणा १, भरोसा १, सवणा ४, दे. घुबे १, कवठळ १, शिरपूर १, जांभोरा १, शेलगांव १, गोरेगांव १, जळगांव जामोद तालुका वाडी खु ३, लोणार शहर ६, मोताळा तालुका टाकळी १, सिं. राजा तालुका बारलिंगा १, मलकापूर तालुका माकनेर २, मलकापूर शहर ९, नांदुरा तालुका डिघी १, संग्रामपूर तालुका सावळी ३, मूळ पत्ता तेल्हारा जि. अकोला १, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना १, महागांव जि. यवतमाळ १, डोंगरगांव ता. बाळापूर जि अकोला येथील एकाचा समावेश आहे.
तसेच कोरोनावर मात केल्यामुळे खामगांव येथील ५, चिखली ६, दे. राजा ७, बुलडाणा अपंग विद्यालय ७, मोताळा १, शेगांव येथील ४ जणांना सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत १ लाख १५ हजार ६०३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.तसेच ७८० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १४ हजार ९४४ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १४ हजार १४५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ६२२ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.