डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या भोसा गावात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण माेठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे आराेग्य विभागाच्या वतीने २१ मे राेजी तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये १९७ जणांची चाचणी केली असता १६ जण पाॅझिटिव्ह आले. ६२ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. २१ मे राेजी ग्रामपंचायत सरपंच व सचिव उपस्थित नसल्याने आरोग्य िवभागाचे आरोग्य सेवक किशोर धोटे, तलाठी म्हस्के शिक्षक देशमुख अंगणवाडी मदतनीस मुके यांना जमिनीवर बसूनच ग्रामस्थांची कोरोना टेस्ट करावी लागली. भोसा गावचे ग्रामसेवक नेहमीच भोसा या गावात हजर राहत नाही. त्यामुळे भोसा या ग्रामपंचायतच्या चाब्या त्यांच्याकडे राहत असल्याने आरोग्य विभागाला आज टेबल खुर्च्या उपलब्ध होऊ
शकल्या नाही. याप्रकरणी चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.