आरोग्य विभागामार्फत डॉ. मंगेश पाटील व आरोग्य सेविका लता कडू आरोग्य सेवक किशोर धोटे व शिक्षक बा.रा.भगत व तलाठी म्हस्के यांच्या पथकानी ही आराेग्य तपासणी केली़ भोसा या गावात अनेक कोरोना रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे़ भाेसा गावात काेराेना रुग्ण वाढत असल्याचे वृत्त १५ मे रोजी प्रकाशित केले हाेेते़ या वृत्ताची दखल घेत डोणगांव आरोग्य केंद्रामार्फत भोसा या गावात १८ मे राेजी १९७ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली़ यामध्ये १६ जण पाॅझिटिव्ह आल्याने १९ मे राेजी पुन्हा ६२ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली़ ग्रामपंचायतच्यावतीने पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे़ मात्र, तिथे सुविधा नसल्याने अनेक जण घरांमध्ये राहत आहेत़ वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गवई यांनी भाेसा येथे भेट देउन पाहणी केली़
भाेसा येथील आणखी १६ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:37 AM