देउळगाव राजात काेराेना रुग्ण वाढले
देउळगाव राजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी शहरातील १८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील अंढेरा येथील ४, वाकी येथील दाेन , सावंगी टेकाळे ४, सातेफळ १, दे. मही १,सिनगाव जहागीर ४, आळंद येेथील चार जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
घर खाली करण्याच्या कारणावरून वाद
बुलडाणा : भाड्याचे घर खाली करण्याच्या कारणावरून घर मालक व भाडेकरू यांचा वाद हाेउन दाेघांनी परस्परविराेधी तक्रारी केल्या. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्यासह एका विरुद्ध ॲटासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सागवान परिसरातील राजेश्वर नगरात २७ फेब्रुवारी राेजी घडली.
रायपूर परिसरातील दुकाने बंद
पिंपळगाव सराई : काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने लाॅकडाउन केले हाेते. शुक्रवारी दुपार रविवारपर्यंत पिपंळगाव सराई, रायपूर परिसरातील दुकाने बंद हाेती. तसेच रस्त्यावर शुकशुकाट हाेता. काेराेना रुग्णांची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.
वीज बिलांची सक्तीची वसुली थांबवा
जानेफळ : लाॅकडाउनच्या काळातील थकीत वीज देयकांची महावितरण कंपनीकडून सक्तीने वसुली करण्यात येत आहे. आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना सक्तीच्या वसुलीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देउन सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी हाेत आहे.
लाेणार येथील २७ जणांची काेराेनावर मात
लोणार : येथील काेविड केअर सेंटरमधील २७ जणांनी रविवारी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तालुक्यातील हिरडव व सुलतानपूर येथील प्रत्येकी दाेघांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.