लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३१६६ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २,७३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सुदैवाने दोन मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ४७, हतेडी एक, दुधा तीन, सुंदरखेड तीन, केसापूर एक, गिरडा सहा, पिं. सराई एक, वरवंड चार, रायपूर एक, सागवन तीन, शिरपूर एक, भालगाव दोन, हिवरा गडलिंग एक, सवणा एक, उत्रादा एक, केळवद एक, सावरगांव डुकरे आठ, सोमठाणा दोन, खैरव एक, कोलारा दोन, किन्होळा दोन, चिखली ३४, सिं. राजा नऊ, साखरखेर्डा चार, रताळी तीन, राजूर एक, बोराखेडी पाच, गोतमारा एक, पान्हेरा चार, वरूड दोन, धा. बढे दोन, खरबडी एक, कोथळी एक, खामगाव ५३, आडगाव चार, घाटपुरी चार, सुटाळा बु. एक, गवंढळा तीन, अंत्रज नऊ, कुंबेफळ एक, खामगाव दोन, दे. राजा २८, दे. मही दोन, सिनगाव जहागीर दोन, उंबरखेड दोन, मेहकर ८, मलकापूर २४, नांदुरा २१, जवळा बाजार १७, लोणार एक, मानेगाव सात, खांडवी चार, धानोरा एक, पिं. काळे दोन, झाडेगाव ५, आसलगाव दोन, चावरा एक, जळगाव जामोद चार, शेगाव १८, भोनगाव दोन, खेर्डा एक, सोनाळा सात, संग्रामपूर दोन, जळगाव खान्देशमधील पळसखेड येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी ४२७ पॉझिटिव्ह, ३५४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:26 AM