बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. साेमवारी आणखी ५६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ५६३ अहवाल निगेटिव्ह आले असून, ५० जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६१९ अहवाल प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील नऊ, बुलडाणा तालुक्यातील पोखरी १, खामगांव शहरातील ११, दे. राजा शहरातील दाेन, मोताळा शहरातील एक, चिखली शहरातील दाेन, शेगाव तालुक्यातील जानोरी १, करंजा १, आळसणा २, शेगाव शहरातील सात, चिखली तालुक्यातील शिंदी हराळी दाेन, अंचरवाडी १, दिवठाणा १, सवडद १, रताळी १, नांदुरा तालुक्यातील शेंबा १, खामगांव तालुक्यातील घाटपुरी १, मांडका १, मलकापूर शहरातील चार , लोणार शहरातील चार, जळगांव जामोद शहरातील एक, मूळ पत्ता निंबा (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील एकाचा समावेश आहे. काेराेनावर मात केल्यामुळे बुलडाणा आयुर्वेद महाविद्यालयातील तीन, शेगाव तालुक्यातील सात, चिखली तालुक्यातील १५, खामगाव तालुक्यातील १५, मोताळा तालुक्यातील ११, सि. राजा येथील पाच, मलकापूर येथील चाैघांना सुटी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत ९४ हजार ४५२ अवाहल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ५३६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच ३९७ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १३ हजार १४ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ५३६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३२१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.