बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे़ आठ दिवसात दाेन ते पाच दरम्यान आढळणारे रुग्ण शुक्रवारी ९ वर गेल्याने चिंता वाढली आहे़ सात तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही़
पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चिखली तालुका बेराळा १, चिखली शहर २, खामगाव शहर १, बुलडाणा शहर १, मेहकर शहर १, लोणार शहर १, दे. राजा तालुका डोढ्रा १, परजिल्हा वाडी बोदरी जि. जालना येथील एकाचा समावेश आहे़
तसेच आजपर्यंत ६ लाख ३७ हजार ८८८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी 1619 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार २५९ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८६ हजार ५५६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे ३१ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.