लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी १,३१६ संदिग्धांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान १,२२५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या आता १०,७८९ झाली आहे. सध्या रुग्णालयात ४४१ जणांवर उपचार करण्यात येत आहेत.शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नांदुरा तीन, अंबोडा दोन, वाडी एक, निमगाव एक, नारखेड एक, खडदगाव दोन, भोसा एक, नांदुरा पाच, मलकापूर एक, भाडगणी एक, चिखली तीन, रुम्हणा एक, जळ पिंपळगाव एक, धांदरवाडी सात, कुंबेफळ एक, सिंदखेड राजा १३, वरवट बकाल एक, जलंब एक, पहुरजिरा एक, शेगाव सात, बुलडाणा ११, देऊळगाव राजा ४, पिंपळगाव एक, जवळखेड दोन, पिंप्री आंधळे एक, देऊळगाव मही दोन, जळगाव जामोद सात, सुनगाव एक, आसलगाव तीन, मडाखेड एक, अंत्री एक, खामगाव चार, पि. राजा एक जण पॉझिटिव्ह आला.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी ९१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:19 PM