शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, २२ काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:03 PM

CoronaVirus News माेताळा तालुक्यातील तळणी येथील ८० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शनिवारी माेताळा तालुक्यातील तळणी येथील ८० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ८१९ अहवाल निगेटिव्ह आले असून ५६ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ८४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ८१९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून २२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत.  पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुका अकोली १, शेगाव शहर १, चिखली तालुका  गांगलगाव १, मुंगसरी १, चिखली शहर ३, दे. राजा शहरातील तीन, लोणार तालुका  खुरमपूर १,  दे. राजा तालुका   जवळखेड १, सिनगाव जहागीर १, तुळजापूर १, खामगाव तालुका  भालेगाव १,  खामगाव शहर ४, मेहकर तालुका जानेफळ १, जळगाव जामोद शहरातील दाेघांचा समावेश आहे. आज काेराेनावर मात केल्याने बुलडाणा  अपंग विद्यालयातून ९, स्त्री रुग्णालय ३,  दे. राजा शहरातील ७, चिखली ११, मोताळा ५, खामगाव ९, नांदुरा १, संग्रामपूर २, शेगाव ८, जळगाव जामोद येथून एकाला सुटी देण्यात आली आहे.    तसेच आजपर्यंत १ लाख रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.   तसेच ३ हजार ५९० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल एक लक्ष आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण  १३ हजार ५६१  कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १३ हजार ७२ कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात ३२५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा