लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २६२ अहवाल निगेटिव्ह असून, ३८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी मंगळवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८ व रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ११४ तर रॅपिड टेस्टमधील १४८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २६२ अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरातील पाच, खामगाव तालुका पळशी २, सुटाळा २, बुलडाणा शहरातील १७ , बुलडाणा तालुका पाडळी १, शेगाव शहर १, दे. राजा तालुका सिनगाव जहागीर १, वाकड १, चिखली तालुका सावरखेड १, भेराड १, चिखली शहरातील दाेन, नांदुरा तालुका धाडी ४, मेहकर शहर २, मोताळा शहरातील २, मोताळा तालुका वडगाव १, मलकापूर शहरातील १ येथील संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. काेराेनावर मात केल्याने चिखली येथील आठ, शेगाव ९, मलकापूर येथील ३, बुलडाणा अपंग विद्यालय १३, स्त्री रुग्णालय १, दे. राजा १, मोताळा ३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तसेच आजपर्यंत ९७ हजार ५७० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ८९५ आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ४२५ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३७० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत,
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ४४ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:35 AM