लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी एकाचा मृत्यू झाला. तसेच ७२ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. ३२ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. भोटा ता. नांदुरा येथील ७४ वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४१६ अहवाल साेमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ३४३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ७३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर २, भोन १, मनसगांव १, मोताळा शहरातील २, मोताळा तालुक्यातील पुन्हई १, मोलखेडा १, तपोवन १, बुलडाणा शहरातील ८ , बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी २ , सातगांव म्हसला २ , दे. राजा शहरातील ३ ,दे. राजा तालुक्यातील सावखेड भोई १, सावखेड तेजन १, असोला १,गारगुंडी १,दगडवाडी १, चिखली तालुका बोरगांव काकडे ६, पेठ १,उंद्री १, चिखली शहर ३, सिं. राजा तालुका सिंदी १, शेलगांव राऊत १, लोणार शहर ३ , लोणार तालुका वडगांव तेजन १, नांदुरा तालुका : फुली १, भोटा १, नांदुरा शहर ९ , मेहकर शहर ३, मेहकर तालुका : उकळी १,परतापूर १, कळंबेश्वर १, शेगांव तालुका कठोरा १, शेगांव शहर ६, जळगांव जामोद शहर ३ आदींचा समावेश आहे. लोणार काेविड केअर सेंटर येथील ६ , बुलडाणा अपंग विद्यालय ७, आयुर्वेद महाविद्यालय २, दे. राजा ५, चिखली २, मेहकर ६, सिं. राजा ४ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना वैदद्यकीय प्राेटाेकाॅलनुसार सुटी देण्यात आली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू ; ७२ काेराेना पाॅझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:27 AM