बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी एकाचा मृत्यू झाला असून ६४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ४०३ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून ४१ जणांनी काेराेनावर मात केली आहे. शुक्रवारी उपचारादरम्यान पारंबी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४६७ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४०३ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत.
पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील दाेन, बुलडाणा तालुका वरवंड १, दे. राजा तालुका सरंबा १, आळंद १, दे. राजा शहर ९, चिखली शहर ७, चिखली तालुका अंचरवाडी १, शेलगाव आटोळ २, सावरगाव डुकरे १, लोणार शहर ९, मलकापूर तालुका दाताळा ३, मलकापूर शहर ६, बुलडाणा शहर ११, नांदुरा शहर १ , जळगाव जामोद शहर १, सिं. राजा तालुका गुंज १, सिं. राजा शहर १, लोणार तालुका पांग्रा १, बिबी १, शेगाव शहर २, मूळ पत्ता जळगांव खानदेश १, खुपटा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील १ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. काेराेनावर मात केल्याने दे. राजा येथून ९, चिखली येथून ६ , बुलडाणा स्त्री रुग्णालय ४, अपंग विद्यालय ५, शेगांव २, खामगांव ११, नांदुरा १, मेहकर येथील तिघांना सुटी देण्यात आली आहे.
१४ हजार २१३ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत १ लाख ११ हजार ५३९ अहवाल रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच १ हजार १५६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १४ हजार २१३ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १३ हजार ६८९ कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ३५३ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.