लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी चिखली तालुक्यातील आमखेड येथील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २८४ काेराेना अहवाल निगेटिव्ह असून ५५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२८ अहवाल रविवारी प्राप्त झाले आहेत. पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील तीन, बुलडाणा तालुक्यातील कोलवड १, चिखली शहरातील एक, चिखली तालुक्यातील पेनसावंगी १, मोताळा तालुक्यातील तरोडा १, लिहा २, कोथळी १, किन्होला १, मोताळा शहरातील पाच, शेगाव शहरातील ११, शेगाव तालुका पळशी १, मानेगाव १, गव्हाण १, जानोरी १, नांदुरा शहर १, मलकापूर शहरातील दाेन, मलकापूर तालुका जांबुळधाबा १, संग्रामपूर तालुका काकन वाडा १, जळगाव जामोद तालुका मालखेड २, जळगाव जामोद शहरातील ४, सिंदखेड राजा शहरातील दाेघांचा समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केल्याने दे. राजा येथील चार, खामगाव १२, बुलडाणा अपंग विद्यालय १५, स्त्री रुग्णालय १, शेगाव १०, सिंदखेड राजा ४, जळगाव जामोद १, नांदुरा २, चिखली येथील सहा जणांना सुटी देण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ४४ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:13 AM