बुलडाणा तहसील कार्यालयात काेराेनाचा उद्रेक झाला असून आणखी एका कर्मचाऱ्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे .त्यामुळे, आतापर्यंत १९ कर्मचारी पाॅझिटिव्ह झाले असून एकाला काेराेनाची लक्षणे आहेत. या कर्मचाऱ्याचा अहवाल प्रलंबित असल्याने तहसीलमधील बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ४ मार्चला तहसिल मधील ३ जण पॉझिटिव्ह आले हाेते. त्यानंतर ७ मार्चला तब्बल १५ कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले. त्या पाठाेपाठ ८ मार्चला आणखी १ जण बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
कामकाज विस्कळीत
तहसीलमधील १९ कर्मचारी पाॅझिटीव्ह निघाल्याने दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्यांना दरराेज काम पडणाऱ्या अन्न पुरवठा कक्षाचे काम ठप्प झाले आहे. अशीच इतर विभागांची गत आहे. तहसीलदार मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज करीत असल्याचे ९ मार्च रोजी दुपारी दिसून आले. अगदी चौकापर्यंत हाऊस फुल्ल राहणाऱ्या तहसिल परिसरात शुकशुकाट व तणावपूर्ण शांतता पसरल्याचे जाणवते.