लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या महिना भरापासून जिल्ह्यात पिस्तूलासह शस्त्रास जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून केल्या जात आहे. या साखळीत १७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर येथूनही एक गावठी पिस्तूल जप्त केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास आठ पिस्तूल आणि तीन ते चार तलवारींसह मोठा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ डिसेंबर रोजी मोताळा येथे छापा टाकून हिमांशु झवर (रा. मोताळा) यास एक पिस्तूल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केली होती. त्याला बोरोखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याच्याची बोराखेडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन पिस्तूल होते. त्यापैकी एक त्याने मलाकपूर येतील सालीपुरा भागातील सुरेश भगवान तायडे याला दिले होते, असे तापासात समोर आले. त्या आनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मलकापुरातील सालीपुरा भागात छापा टाकून सुरेश भगवान तायडे याच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे हे पिस्तूलजप्त केले आहे.या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अताउल्लाखान, पोलीस नायक गजानन आहेर, रघुनाथ जाधव, युवराज शिंदे, सतीश जाधव, वैभव मगर, गजानन गोरले, विजय वारुळे, विजय सोनवणे, नदीम शेख, सरिता वाकोडे, राजू आडवे, राहुल बोर्डे यांनी सहभाग घेतला होता.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:31 AM
Another pistol seized स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर येथूनही एक गावठी पिस्तूल जप्त केले.
ठळक मुद्देसुरेश भगवान तायडे याच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे हे पिस्तूल जप्त केले आहे.विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन पिस्तूल होते.