लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:22 PM2021-02-17T12:22:39+5:302021-02-17T12:22:48+5:30

Lonar Sarovar लोणारला आणखी ७२ कोटी रुपये वेगळा विकास निधी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे.

Another Rs 72 crore will be provided for Lonar development | लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार

लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील जागतिक ठेवा पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी कटिबद्ध असून लोणारला आणखी ७२ कोटी रुपये वेगळा विकास निधी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृह जिल्ह्यातील पर्यटन संबंधातील प्रश्नांवर आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी खा. जाधव यांनी लोणार, सिंदखेड राजा, शिवाय शेगाव येथील विकासात्मक प्रश्नांबाबत आग्रही भूमिका मांडली.
लोणार निसर्ग पर्यटनाच्या कामाकरिता अतिरिक्त निधी देण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केली. शिवाय प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेमध्ये लोणारचा समावेश करण्यासाठी राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा अशीही मागणी याप्रसंगी पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. कमळजा माता मंदिरापर्यंत सरोवराच्या काठावर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करण्याची मागणी ही त्यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील लाेणार, सिंदखेडराजा येथील अधिकारी व पुरातत्व विभागाचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित हाेते.


आनंद सागर सुरू करा...
बुलडाणा जिल्ह्यात शेगावला येणाऱ्या भाविकांच्या सोबतच पर्यटन दृष्ट्या आनंद-सागर महत्त्वाचे ठरले होते. मात्र काही कारणांमुळे ती सध्या बंद आहे. यासाठी सरकारी पातळीवरून आनंद सागर पूर्ववत सुरू करण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंद सागर देखील पूर्व सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


राजवाड्याचा दरवाजा आज उघडणार
सिदखेडराजा येथील राजवाड्याचा दरवाजा १७ फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार आहे. त्याप्रमाणे मातृतीर्थ विकास आराखड्यातील २५ कोटी रुपयातील पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये उर्वरित कामे जलद गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Another Rs 72 crore will be provided for Lonar development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.