लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी एकाचा मृत्यू झाला असून ६५ जणांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच १०६६ काेराेना अहवाल निगेटीव्ह आले असून ८४ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या ९ हजार ५७८ वर पाेहचली आहे. जळगाव जामाेद येथील ७०वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1131 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1066 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 65 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 604 तर रॅपिड टेस्टमधील 462 अहवालांचा समावेश आहे. आज ८४ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यामध्ये दे. राजा 20, खामगांव 6, लोणार 3, शेगांव 5, सिं. राजा 8, मेहकर 17, जळगांव जामोद 4, संग्रामपूर 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 1, आयुर्वेद महाविद्यालय 11, मोताळा 3 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 48 हजार 122 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8 हजार 995 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8हजार 995 आहे. जिल्ह्यातील 2हजार 885 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 48 हजार 122 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9 हजार 578 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8 हजार 995 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 456 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 127 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एका महिलेचा मृत्यू, ६५ काेराेना पाॅझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 11:37 AM