लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अंनिसच्या बुलडाणा शाखेतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १९ आॅगस्ट ‘जबाब दो’ आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष, समाज सुधारक, पुरोगामी विचारवंत, पद्मश्री डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला २० आॅगस्ट रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही डॉ.दाभोलकर यांच्या मारेक-यांना पकडण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. सोबतच कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून होऊन अडीच वर्षे होत आहेत. डॉ.कलबुर्गी यांचेही मारेकरी मोकाट आहेत ही बाब महाराष्टÑासाठी लाजीरवाणी आहे. या विचारवंतांचे मारेकरी पकडणार केव्हा? हा प्रश्न राज्य सरकारला विचारण्यासाठी व मारेकºयांना केव्हा पकडणार ? याचा जबाब घेण्यासाठी आज महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समिती, बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदिप हिवाळे, जिल्हा सरचिटणीस पंजाबराव गायकवाड यांच्या पुढाकारासाठी जिल्हा उपाध्यक्ष ना.है. पठाण, जि.प.सदस्य डि.एस.लहाने, निलेश चिंचोले, नरेंद्र लांजेवार, कि. वा. वाघ, सुधीर देशमुख, डॉ.मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे, शाहिणाताई पठाण, प्रा.डॉ.इंदुमती लहाने, श्रीमती विजया काकडे, शाहीर डी.आर.इंगळे, डी.पी.वानखेडे, प्रा.बी.डी.खरात, संदीप लहासे, गजानन अंभोरे, दिपक फाळके, अनिल मेटांगे, सौ.कल्पना माने, दिपाली. सुसर, प्रा.रविंद्र साळवे, रमेश आराख आदींची यावेळी उपस्थिती होती.राज्य तथा केंद्र शासनाने डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ.कलबुर्गी यांच्या मारेकºयांचा त्वरीत शोध घ्यावा अन्यथा महाराष्टÑ अंनिसच्या वतीने ‘हिंसेला नकार- मानवतेचा स्विकार’ हे आंदोलन मोठ्या प्रमाणात देशभर राबविण्यात येईल, असे मनोगत याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदिप हिवाळे यांनी व्यक्त केले.
अंनिसतर्फे ‘जबाब दो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 8:18 PM
बुलडाणा : अंनिसच्या बुलडाणा शाखेतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १९ आॅगस्ट ‘जबाब दो’ आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन डॉ.दाभोलकर यांच्या मारेक-यांना केव्हा पकडणार ? जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन