बुलडाणा, दि. २0 - अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज असून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तक्रार देणार्यांनी पुढे येणे गरजेचे आहे; मात्र याबाबत तक्रार देणारे पुढे येत नसल्यामुळे तसेच पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्यामुळे जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्यात २२८ गुन्हे दाखल आहेत. अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशाच बाधा इत्यादींमुळे तसेच, भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना फार मोठय़ा संख्येने उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. जादूटोणा करणार्या व्यक्ती, भोंदूबाबा यांचा आपल्याकडे चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि यांची समाजविघातक व नुकसानकारक कृत्ये यांमुळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि या अंधविश्वासामुळे व अज्ञानामुळे ते अशा भोंदूबाबा आणि जादूटोणा करणार्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत, जादूटोणा करणार्या या व्यक्ती, भोंदूबाबा यांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सामान्य जनतेला वाचवणे व अशा अनिष्ट परिणामांना आळा घालण्यासाठी तसेच महाराष्ट्र जादूटोणा, अनिष्ट आणि अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एप्रिल १00५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेने कायदा मंजूर केला होता; मात्र या काद्यांतर्गत फिर्यादी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे भोंदूबाबा तसेच जादूटोणा करणारे फायदा घेत आहेत. या कायद्यान्वये यावर्षी जिल्ह्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्यात २२८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जादूटोणा कायद्यानुसार दाखल झालेले गुन्हे या कायद्यान्वये पहिला गुन्हा बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून फिर्यादी रणजितसिंग राजपूत तर आरोपी होते स्वामी परस नंगगिरी, दुसरा गुन्हा चिखली पोलीस स्टेशन, फिर्यादी प्रतिभा भुतेकर, आरो पी हरिदास ऊर्फ नागनाथबाबा, तिसरा गुन्हा बुलडाणा पोलीस स्टेशन फिर्यादी अजय माहुले तर आरोपी शक्ति प्राशन औषध कंपनीचे उत्पादक, वितरक इतर, दिल्ली, चौथा गुन्हा बुलडाणा पोलीस स्टेशन, फिर्यादी देवीदास कंकाळ, आरोपी वसंत दौलत जाधव, पाचवा गुन्हा लोणार पोलीस स्टेशन फिर्यादी सोहेम शर्मा व अरोपी शेख अकील, शेख हरुण इतर.जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मोठय़ा प्रमाणात भोंदूबाबा व जादूटोणा करणार्याविरुद्ध तक्रारी येतात; मात्र पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी फिर्यादी पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी पोलिसांनी सहकार्य करून समाजात जनजागृतीची गरज आहे.-प्रा. प्रतिभा भुतेकर, महिला संघटक, अंनिस, बुलडाणा.
तक्रार करण्याच्या उदासीनतेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अडगळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 2:25 AM