बुलडाणा : शहर व परिसरातील तरुण विद्यार्थ्यांंची दिशाभूल करून कॉम्प्युटर जॉबवर्कच्या नावाखाली त्यांची लाखो रुपयाने फसवणूक करून फरार झालेल्या आरोपींचा जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.याबाबत २३ मे २0१४ रोजी किरण दिनकर गवई याने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला सविस्तर तक्रार देऊन आरोपी युसुफ नासीर बाणवाली, नासीर हुसेन बागवाला यांना अटक करण्याची मागणी केली होती; मात्र सदर आरोपी शहरातील त्यांचे दुकान बंद करून फरार झाले होते. याप्रकरणी फसवणूक झालेले पवनकुमार तायडे १0,४३,३८0, विवेक उबरहंडे ९000, वैशाली कोलते ५,६५,५00, नरेश इंगळे १0,४३,३८0 विवेक उबरहंडे ९000, वैशाली कोलते, ५,६५,५00, नरेश इंगळे १0,६३,६८0, प्रकाश जाधव ५0,000, सुदाम काकुर्डे २९000, राहुल दांदले ३७00 असे व इतर साक्षीदार मिळून ३५,८९,५४0 रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले होते.बुलडाणा पोलिसांनी पुणे, मुंबई येथे आरोपींचा शोध घेतला. त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांचे पुणे येथील विविध बँकात असलेले खाते सिल केले; परंतु सदर वरील आरोपी हे त्यांच्या जाळय़ात सापडले नाहीत. विद्यमान न्यायालयाने त्यांच्या पहिला अटकपूर्व जामीन अर्जाच्या विरोधात आरोपीने जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल केला होता. तो जामीन अर्ज ५ डिसेंबर २0१४ रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता, तर तिसर्यांदा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांच्या न्यायालयात २ जानेवारी २0१५ रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सदर अर्ज ५ जानेवारी रोजी न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावत, सदर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विजय सावळे यांनी युक्तिवाद केला.
‘त्या’ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: January 07, 2015 12:31 AM