उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप रखडले
सुलतानपूर : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅसचे वितरण रखडले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा परिणाम विविध शासकीय योजनांवर झाला आहे. त्यात उज्ज्वला गॅस योजनेलाही कोरोनाचा खोडा निर्माण झाला आहे.
कर्णकर्कश हॉर्नने ध्वनिप्रदूषणाचा धोका
दुसरबीड: बाईकवेड्या तरुणांकडून विचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. मात्र, हॉर्नचे डेसिबल मोजण्याची मशीन वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसते.
आश्रमशाळेतील शिक्षकांना मुख्यालयाची ॲलर्जी
बुलडाणा : जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळेच्या आवारात निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र, ही निवासस्थाने ओस पडलेली आहेत.
बीबी ते किनगाव जट्टू रस्त्याचे काम रखडले!
बीबी : पालखी मार्गाचे बीबी ते किनगाव जट्टूपर्यंतचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु अर्धवट सोडलेले हे काम गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना या अर्धवट कामामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याची कामे त्वरित सुरू करून पूर्ण करण्याची मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.
गोहोगाव दांदडे येथे धूरफवारणी
गोहोगाव दांदडे: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव परिसरात वाढत आहे. गावातील नागरिक ताप, टायफाॅईडसह विविध साथ आजारांनी त्रस्त झाले आहेत. यामुळे गावात डासांचा नायनाट करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने धूरफवारणी करण्यात आली.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भाेजन
मेहकर : ज्यांच्या घरी कोरोनाबाधित रुग्ण असतील त्यांच्या परिवाराची जेवणाची व्यवस्था होत नसेल, अशा रुग्णांच्या संपूर्ण परिवाराकरिता श्री बालाजी संस्थान मेहकरतर्फे घरपोच जेवणाच्या डब्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे़
काेरोनामुळे मालकरणींवर आर्थिक संकट
बुलडाणा : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या मोलकरणींवर मोठे संकट आले असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत
धामणगाव धाडः अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. अतिवृृृृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता रासायनिक खताच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
माेताळा : खरीप हंगाम संपून पाच महिने लोटले असताना सुद्धा व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीचीसुद्धा मदत पीक विमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावरसुद्धा कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.
वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्या
धामणगाव बढे : गावामध्ये वीज वितरणसंदर्भात विविध समस्या असताना व वेळोवेळी त्यासंबंधीचे निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे .
ढगाळ वातावरणाचा उन्हाळी पिकांना फटका
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असल्याने उन्हाळी पिकांचे नुकसान हाेत आहे़ काही गावांमध्ये पाऊसही झाल्याने टरबूज, खरबूज पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़