शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

गणेशोत्सवात विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:51 PM

पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांची मदत घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गणेशोत्सव काळात पोलिसांची कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यावर भर असला तरी यंदा पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांची मदत घेण्यात येणार आहे. गणेश मंडळामधीलच सकारात्मक युवा नेतृत्त्व पुढे आणण्यासोबतच मंडळस्तरावर होणाºया मनोरंजनात्मक कार्यक्रमादरम्यान प्रसंगी महिलांची होणारी छेडछाड टाळण्याच्या दृष्टीकोणातून मंडळातीलच सदस्यांनी सक्रीय व्हावे, हा दृष्टीकोण यामागे ठेवण्यात आला आहे.विशेष म्हणजे अशा विशेष पोलिस अधिकाºयांना नियुक्तीपत्र ही देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सण उत्सवाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी अनुषंगीक विषयान्वये थेट संवाद साधला असता त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातून करण्यात येणाºया उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. संवेदनशील भागामध्ये पोलीसांची नजर असून, त्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मलकापूर, खामगाव हे संवेदशील शहर पोलिसांच्या रडारवर आहेत. आगामी काळात असलेल्या विधानसभा निवडणुकामुळे गणेशोत्सवाचा काही असामाजिक तत्त्व गैरफायदा घेऊ शकतात.उत्सव काळातील हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभागाने गणेश मंडळामधीलच व्यक्तीला विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. गणेश मंडळातील हे विशेष पोलीस अधिकारी केवळ गणेश उत्सव काळापुरतेच राहणार असले तरी, त्यांची मोठी मदत पोलीस विभागाला होणार आहे.त्याचबरोबर यातून पोलीसांशी असणारा समन्वय वृद्धींगत होणार आहे. हा अभिनव प्रयोग बुलडाणा पोलिसांच्या ईतिहासात प्रथमच राबविण्यात येत आहे. मेळाव्यादरम्यान मेळावा अगर मिरवणुक रस्त्याने जात असतांना त्यातील कोणत्याही व्यक्तीने विशेष परवान्याशिवाय कोणतेही अग्नीशस्त्र, मशाल टेंभे, तलवार, खंजीर, कट्यार, चाकु, काठ्या, बांबु, छोटे दगड, गोफन, अगर कोणतेही शस्त्र अगर ज्यायोगे दुखापत करता येईल असे कोणतेही शस्त्र किंवा पदार्थ घेवुन जावु नये अथवा जवळ बाळगु नये, अशा सुचना पोलिस विभागाने दिलेल्या आहेत.याची योग्य अंमलबाजवणी होते की, नाही किंवा ज्यांच्या जवळ असे शस्त्र किंवा वस्तु सापडतील त्यांच्या जवळुन ते घेवुन पोलीसांच्या ताब्यात देण्यास नियुक्त विशेष पोलीस अधिकाºयांची महत्त्वपूर्ण मदत जिल्हाभरात पोलीस विभागाला होणार आहे.

संवेदनशील शहरामध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याच्या दृष्टीकोनातून गणेश मंडळातील व्यक्तींमधून विशेष पोलीस अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मंडळाचा पोलीसांशी असणारा समन्वय वृद्धींगत होईल व गैरप्रकार टाळण्यास मदत होणार आहे.-डॉ. दिलीप पाटील भुजबळ,जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाGanesh Mahotsavगणेश महोत्सव