बुलडाणा : काँग्रस-आघाडी शासन असताना राज्यातील महामंडाळा प्रमाणेच जिल्हास्तरावरील विविध समित्यांवरच्या नियुक्तया रखडल्या होत्या तोच प्रकार महायुतीच्या काळातही कार्यकर्त्यांंना अनुभवास येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात नियुक्यांचे सुत्र ठरवून कार्यकर्त्यांंना संधी दिली गेली मात्र युती मध्ये असलेले ताणतणाव बघता नियुक्तांचे सुत्र कसे राहिल याबाबत कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. राज्यात जवळपास ५५ महामंडळ तसेच जिल्हा व तालुकास्तरावर ४६ समित्या आहेत. या सर्वांंवर पदाधिकारी म्हणुन राजकीय व्यक्तींच्या नियुक्ता होतात. पालकमंत्री यांच्या शिफारशी नंतर अनेक नियुक्त्यांचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत त्यामुळे जिल्हास्तरावरील नियुक्तांमध्ये पालमंत्र्यांचीही भूमिका महत्वाची राहते. संजय गांधी निराधार समिती, रोजगार हमी योजना समिती, जिल्हा रोजगार, स्वयं रोजगार समिती, जिल्हा शिक्षण सल्लागार समिती, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समिती, हुंडा निर्मूलन दक्षता समिती,यासारख्या जिल्हा व तालुकास्तरीय अशा जवळपास ४६ समित्या आहेत. या समित्यांवर जवळपास १00 ते १२५ कार्यकर्त्यांंंची वर्णी लागणे शक्य होते. त्यामुळे या नियुक्त्यांकडे कार्यकर्त्यांंचे लक्ष लागलेले आहे.
समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या
By admin | Published: April 17, 2015 1:34 AM