लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : साखरखेर्डा येथे बुधवारी सकाळी ६ वाजता गुड मॉर्निंंग पथक धडकताच उघड्यावर जाणार्यांची तारांबळ उडाली. यामध्ये ४५ व्यक्तींवर कारवाई करून त्यांना समज देऊन सोडले. गुड मॉर्निंग पथकाच्या या कारवाईमुळे उघड्यावर जाणार्यांना चाप बसत आहे.तीर्थक्षेत्र साखरखेर्डा नगरीत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, ही मागणी कित्येक वर्षापासूनची आहे; परंतु येथील ५0 टक्के लोक उघड्यावर बसत असल्याने रस्त्याने जाणार्या- येणार्या लोकांना दुर्गंंधीचा सामना करावा लागतो. वार्ड क्र.६ मधील खुल्या एन.ए. प्लॉटवर महिला उघड्यावर शौचास बस तात. म्हणून तेथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लाग तो. कित्येक वेळा प्रकरण हातघाईवरसुद्धा आले. स्थानिक ग्राम पंचायतीकडे तक्रार देऊनही प्रकरण मार्गी लागत नव्हते. गुडमॉर्निंंग पथकाने साखरखेर्डा येथील उघड्यावर बसणार्यांवर कारवाई केली. या पथकामध्ये ग्रामविस्तार अधिकारी श्रीधर काळे, ग्रा.पं. सचिव मनोज मोरे, ग्रामसेवक लिंबाजी इंगळे, र ितलाल पंढरे, डी. एस. काळे, सोनाली जगताप, कल्पना पडघान, प्रदीप लंबे, ग्रा.पं.कर्मचारी रवींद्र कुळकर्णी, श्रीपाद् अंबास्कर, शांताराम गवई, गणेश इंगळे, विजय इंगळे, पोहेकॉं संजय कोल्हे, चौगुले आणि चार महिला पोलिसांचा या समावेश होता. यामध्ये ४५ व्यक्तींवर कार्यवाही करून त्यांना समज देण्यात आली.
उघड्यावर बसल्यास होणार ५00 रुपये दंडलोणार : शहर व परिसरात सार्वजनिक मध्यवर्ती मोकळ्या भूखंडांवर केरकचरा टाकल्यास अथवा उघड्यावर शौचास बसणार्यांवर ५00 रुपये दंड करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. १५ ऑगस्टपयर्ंत जागतिक पर्यटन स् थळ लोणार सरोवर शहर हागणदारीमुक्त करू, असे प्रतिपादन मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले. लोणार नगर परिषदला १५४६ शौचालयाचे उद्दिष्ट मिळाले होते. १000 शहर वासीयांना शौचालयाचे अनुदान देण्यात आले आहे. लोणार नगर परिषद तर्फे जागतिक पर्यटन स्थळ लोणार शहर हागणदारीमुक्त व स्वच्छतेसंदर्भात सक्रिय झालेले असून नगर परिषद मु ख्याधिकारी विजय लोहकरे व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी प थक स्थापन केले आहे. दररोज सकाळी ५ वाजेपासून शहरात ठिकठिकाणी पथक दिसल्यामुळे अनेकांची पाचावर धारण झाली आहे. केवळ नगर परिषद प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागृत राहावे. शहराच्या स्वच्छतेला मुद्दाम जी व्यक्ती स्वत: गालबोट लावेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.
उघड्यावर बसणार्या १७ जणांना पकडलेसवणा : उघड्यावर जाणार्या १७ जणांवर गुडमॉर्निंंग पथकाने २ ऑगस्ट रोजी येथे कारवाई केली. उघड्यावर बसणार्यांच्या विरोधात प्रशासनाने ठोस पाऊले उचलली असून कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे. यानुसार २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान गुडमॉर्निंंग पथकाने धाड टाकली. यावेळी १७ जण उघड्यावर बसल्याचे आढळून आले. यावेळी या नागरिकांना गुड मॉर्निंंग पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकात विस्तार अधिकारी कणखर, जे.डी.इंगळे, अंभोरे, गिते, ग्रा.वि.अ. ए.एन.जाधव, धनवे, चिखली पो.स्टे. पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या झालेल्या गुडमॉर्निंंग पथकाच्या कारवाईने उघड्यावर शौचास बसणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
मेरा बु. येथे गुडमॉर्निंंग पथकाची १५ जणावर कारवाईअंढेरा : येथून जवळच असलेले ग्राम मेरा बु. येथे उघड्यावर शौचालयास बसणार्या १५ जणावर पंचायत समिती चिखली ये थील पथकाने पकडून अंढेरा येथील पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये मारोती तोडे, देविदास करडे, संदीप गायकवाड, भगवान दातार, ज्ञानदेव पडघान, नारायण पडघान, सुनिल डोंगरदिवे, आकाश डोंगरदिवे, बद्रीनाथ गायकवाड, अंबादास बलकार यांच्यावर पं.स.चिखली येथील पथकाने कारवाई केली. या पथक प्रमुख गणेश शिंदे, सुरडकर, आरमाळ, काकड, राजपूत, खेडेकर ग्रामसेवक यांनी कार्यवाही करुन सोडून देण्यात आले.