टोकण पद्धतीने सुरू असलेल्या लसीकरणासाठी रांग लावावी लागते. उन्हाळा असल्याने वृद्धांचे हाल होत आहेत. हीच अडचण लक्षात घेऊन भाजप पदाधिकारी विनोद वाघ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात टेंट टाकून सावलीची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. जोपर्यंत लसीकरण सुरू आहे, तोपर्यंत ही व्यवस्था कायम राहील, असेही वाघ यांनी सांगितले आहे.
वाघ यांच्या या भूमिकेबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. विनोद वाघ यांनी या केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बोडखे, शिवाजी काळुशे, छगन खंदारे, वैभव देशमुख, गजानन आघाव, राजू गुंजाळ, रवी काळूशे, दीपक साळवे, प्रसाद कुलकर्णी, गणेश सानप, पवन झोरे, दीपक झोरे, राजेश सांगळे, जनार्धन हरकळ, गजानन काळुशे, दीपक पडुळ उपस्थित होते.