कोरोना महामारी आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हिवरा आश्रम येथील शासकीय कोविड केअर सेंटर हे गोरगरीब जनतेसाठी संजीवनी असणार आहे. आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या वतीने शासकीय कोविड सेंटर येथील रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मोफत चहा, नास्ता, दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेची व रुग्णालयाची पाहणी ऋषी प्रतापराव जाधव व निरज संजय रायमुलकर यांनी केली. या भोजनाची व व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी शिवसेना-युवासेना पदाधिकारी व ग्रामपंचायत तथा समस्त गावकरी यांनी स्वीकारली आहे. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित धांडे, डॉ. पागोरे, डॉ. धाडकर, नर्स इतर स्टाफ, शिवसेना शाखाप्रमुख विठ्ठल भाकडे, तालुका प्रमुख भूषण घोडे, ग्रामसेवक सदाशिव म्हस्के, नितीन इंगळे, उपसरपंच रमेश गिरी, माजी सरपंच मनोहर गिर्हे, दामोदर गारोळे, अशोक लहाने, किशोर मोरे, युवासेना उपतालुका प्रमुख पवन शेळके, मंगेश काकडे, सचिन गिरी, विजय कंकाळ आदी उपस्थित होते.
===Photopath===
240521\img-20210524-wa0018.jpg
===Caption===
photo