लोकमत न्यूज नेटवर्कधाड : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपाखाली, जामठी ता. बुलडाणा येथील पिता-पुत्रास धाड पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे. याबाबत रफीक सुलेमान जाधव (तडवी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाळू धनराज महाले व धनराज नामदेव महाल या दोघांविरुद्ध ३६३, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद करून बाप-लेकास अटक करण्याची कारवाई केली.
अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या बाप-लेकास अटक
By admin | Published: June 15, 2017 12:25 AM