मेहकर : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एकास शुक्रवारी मेहकर पाेलिसांनी अटक करून अमरावती पाेलिसांच्या ताब्यात दिले़
अमरावती येथील एका पालकाने आपल्या मुलीचे आराेपी अक्षय श्रावन नरवाडे (रा. अमरावती) याने अपहरण केल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे केली हाेती. या प्रकरणी गाडगेनगर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता. अल्पवयीन मुलीस घेऊन आराेपी पसार झाला हाेता. आराेपी सुलतानपूरवरून मेहकरकडे येत असल्याबाबत मेहकरचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांना गुप्त माहिती मिळाली हाेती. त्यांनी पोलीस हेड कॉन्टेबल प्रभाकर सानप, गणेश लोढे यांना सोबत घेऊन आरोपीला मेहकर बायपासवर अटक केली तसेच सोबत असलेल्या पीडित मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन आले. आरोपी व पीडितेला अमरावती येथील गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.