बुलढाणा : व्हॉटसॲपद्वारे महिलेशी अश्लील चॅटींग करणाऱ्या एका सायबर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १५ मार्च रोजी रात्री उशिरा करण्यात आली. याप्रकरणी पीडितेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये १७ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने व्हर्च्युअल मोबाइल क्रमांकावरुन व्हाटसॲपद्वारे अश्लील चॅटींग करुन पीडित महिलेला लज्जा वाटेल असे मेसेज पाठविले.
ऐवढेच नव्हे तर ऑनलाइन पाठलाग करुन त्याची ओळख लपवून शिविगाळ केली. त्या महिलेला ‘तु राहतेस त्या गावी येऊन बदनामी करेन’ अशी धमकी दिली. अशा तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान तपासात मिळालेल्या तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे फिरोज ताज मोहम्मद पठाण (रा.तळणी, ता. मंठा,जि.जालना) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सारंग नवलकार,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल साळुंके, पोलीस अंमलदार रामेश्वर मुंढे, ज्ञानेश्वर नागरे, भारत जंगले, पवन मखमले, केशव घुबे, राहुल इंगळे, राजु आढवे, कैलास ठोंबरे, अविनाश मुंढे यांनी केली.