खामगाव : यावर्षी शेतकरी यावर्षी आस्मानी संकटाने त्रस्त झाला असतानाच आता ऐनवेळी पिकांना आवश्यक असलेल्या युरीयासाठी त्यांची अडवणूक केल्या जात असून जादा किंमत दिली तर सहजरित्या युरीया उपलब्ध होत आहे. २९0 रुपये निर्धारित किंमत असलेल्या युरीयाच्या एका बॅगसाठी २९0 रुपये ऐवजी ३५0 ते ४00 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या विदर्भातील संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी अशा खत विक्रेत्यांवर कडक कारवाई करुन खत विकत मागणार्या शेतकर्यांना तात्काळ खत उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात विशेष म्हणजे विदर्भात यावर्षी आता येईल, नंतर येईल असे करता करता पावसाने तब्बल अडीच महिने हुलकावणी दिली. यामुळे अनेकांना वेळेवर पेरणी कर ता न आल्याने उत्पादन व उत्पन्नाचा विचार न करता येणारी पिके घ्यावी लागली. तर अनेकांना पहिल्या पेरणीचा खर्च सहन करुन दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे. यावर्षी मूग वा उडिदाची पिके घेता न आल्याने अद्याप शेतकर्यांच्या हाती पिकाचा पैसा नाही. त्यामुळे शेतीमशागतीसाठी उसनवार करावी लागत आहे. त्यात आ ता तूर्त आस्मानी संकट टळल्याने पिकांचा स्थिती चांगली आहे. मात्र युरीया खत पिकांना देण्याची वेळ आल्याने शेतकरी युरीयासाठी गर्दी करीत आहेत. मात्र शेतकर्यांची ही गरज ओळखून अनेक खतविक्रेत श्रीमंतीच्या हव्यासाने शेतकर्यांची अडवणूक करीत असून युरीया नसल्याने ठरलेले उत्तर शेतकर्यांना देत आहेत. तर २९0 रुपये प्रतिबॅग ( ५0 किलो) साठी ३५0 रुपये देणार्यांना सहजच हव्या तेवढय़ा युरीया बॅग उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या जादा वसुलीबाबत विविध कारणे सुध्दा शेतकर्यांना सांगण्यात येत आहेत. मात्र अशी अडवणूक सुरु असताना अद्याप एकाही अशा खतविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. तर गरजेपोटी अक्कल नसते त्यामुळे शेतकरी सुध्दा तक्रारीच्या भानगडीत न पडता नेहमीच घ्यावे लागते त्यामुळे जादा पैसे देवून युरीया खताची खरेदी करीत आहेत. यामुळे अधिकारी सुध्दा त्याकडे कानाडोळा करीत आहेत. मात्र भारत या कृषीप्रधान समजल्या जाणार्या देशा तील जगाचा पोशिंदा शेतकर्यांची ही अडवणूक थांबविण्यासाठी अधिकार्यांनी अशा ख तविक्रेत्यांवर कारवाई करुन शेतकर्यांना निर्धारित भावात खत उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. * शेतकर्यांची अडवणूक करुन साठा असतानाही युरीया व इतर रासायनिक खतांची जादा भावाने विक्री करणे हे दरवर्षीचेच झाले आहे. मात्र अल्पभूधारक तसेच बहुतांश शेतकर्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते खत सुरुवातीला घेवू शकत नाही. त्यामुळे ऐनवेळी ही अडवणूक नित्याचे झाले आहे. मात्र त्यावर अद्यापही संबंधित कृषी विभाग प्रतिबंध लावू शकला नाही.
* अनेक खतविक्रेत्यांजवळील युरीयाचा साठा विक्री झाला आहे. मात्र ग्राहकी असल्याने तसेच शेतकरी सुध्दा गरजेपोटी जादा पैसे देत असल्याने मोठय़ा खतविक्रेत्यांकडून जादा भावाने आणून युरीयाची विक्री केल्या जात आहे.