आशा स्वयंसेविकांचा दैनंदिन भत्ता वाढवून मिळावा, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत कायम करा, घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्यासाठी जबरदस्ती करू नये अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असल्याची माहिती यावेळी आशा स्वयंसेविकांनी दिली.
महाराष्ट्र राज्य आशा - गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने २० मे रोजी सरकारला निवेदन देऊन मागण्या पूर्ण न झाल्यास १५ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा साकारला देण्यात आला होता. मात्र या मागण्यांवर सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने आशा स्वयंसेविका संपावर गेल्या आहेत़ या संपात सुलतानपूर येथील शशिकला मोरे, शीला रिंढे, शारदा मुळे, आशालता पनाड, मीना मोरे, आशा पनाड, राधा रिंढे, आदी सहभागी झाल्या आहेत़