लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्या त आले; मात्र आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजविण्यास नकार दिला आहे. जिल्हाभरातील ग्रामीण व शहरी भागात जनतेच्या आरोग्य संवर्धनाचे काम करणार्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ३ ऑक्टोबर रोजी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसेविकांनी संप पुकाल्यामुळे शासनाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाला प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांकडून अंगणवाडीत पोषण आहार शिजवून मुलांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र याला विरोध होत आहे. सीटू प्रणित आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शहरी व ग्रामीण जनतेचे आरोग्य संवर्धन करण्याचे काम आशा वर्कर्स व गटप्रवर्तक करीत असतात; मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिल्या जात नाही. तसेच त्यांना केसेसनिहाय दिला जाणारा अत्यल्प मोबदलादेखील पाच-पाच, सहा-सहा महिने मिळत नाही. त्यामुळे आशा वर्कर्सना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. आशा वर्कर्सना १0 हजार व गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, आशा वर्कर्सना वजनकाटे, झोळी, तापमापी खरेदी त्यांच्याच पैशाने खरेदी करण्याचे सांगि तले जात आहे. हा आशा वर्कर्सवर मोठा अन्याय आहे. जिल्ह्यातील अनेक गटप्रवर्तकांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही, तो आदेश त्वरित देण्यात यावा. एप्रिलपासून थकीत असलेला आशा वर्कर्सचा मोबदला तत्काळ देण्यात यावा, तसेच गटप्रवर्तकांचे थकीत मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, गटप्रवर्तकांनी गावांना भेटी दिल्याबाबत त्या गावातील नागरिकांची सही घेण्याचा आदेश रद्द करण्यात यावा, नगरपालिकेंतर्गत काम करणार्या शहरी आशा वर्कर्सना गणवेश व ओळखपत्र द्यावेत, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृ त्वात झालेल्या आंदोलनात वर्षा शेळके, विजया ठाकरे, ज्योती ठेंग, ललीता बोदडे, मंदा म्हसाळ, अरुणा रत्नपारखी, मंगला गव्हले, ऊर्मिला माठे, गोदावरी खंडेराव, इंदिरा इंगळे, सुरेखा ढगे, चंदा झोपे, नलीनी गोरे, प्रमोदिनी वळसे, अनिता कदम, सं तोषी नागरे, प्रतिभा बानाईत, नीता कायंदे यांच्यासह मोठय़ा सं ख्येने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविकांची कामे करण्यास ‘आशां’चा नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:19 AM
बुलडाणा: अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्या त आले; मात्र आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजविण्यास नकार दिला आहे.
ठळक मुद्देआशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित