लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न होत असून यावर्षी महत्त्म असे पीक कर्ज आतापर्यंत शेतकºयांना वाटप केल्या गेले आहे तसेच पंतप्रधान पॅकेजअंतर्गतच्या उपाययोजना करण्यात येत असून आता त्याचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू झाला आहे. आत्मनिर्भर योजनेतंर्गतही अस्थायी विक्रेत्यांना कर्जवाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी दिली. अनुषंगीक विषयान्वेय त्यांची संवाद सादला असता एकंदर वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.
पंतप्रधान पॅकेज अंमलबजावणीची सध्याची स्थिती काय?पंतप्रधान पॅकेजअंतर्गत नियमीत खातेदारांना कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ज्यांनी कर्ज नाकारले आहे त्यांना देण्यात आले नाही. सध्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत दुसºया टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाली असून यात थकबाकीदार असलेल्यांना कर्ज देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पीक कर्ज वाटपाची स्थिती काय?जिल्ह्यात एकूण उदिष्ठाच्या ४३ टक्के रकमेचे पीककर्ज शेतकºयांना वाटप करण्यात आले असून पात्र शेतकºयांपैकी ६७ टक्के शेतकºयांना १,०४८ कोटी रुपयांचे आतापर्यंत पीक कर्ज वाटप झाले आहे. गेल्या चार वर्षातील हे महत्तम वाटप आहे.
कर्जमाफीची रक्कम किती शेतकºयांच्या खात्यात जमा झाली? जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ५३५ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेले असून त्यांची यादी प्राप्त झाली आहे. पैकी १ लाख १२ हजार ८१९ शेतकºयांच्या खात्यात आतापर्यंत ८९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे मध्यंतरी लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्या कालावधीत काही शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण रखडले होते. आता ते पुर्ण करण्यात येत असून पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. सोबतच कर्जमाफीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचाही निपटारा करण्यात येत आहे.
केंद्राच्या आत्मनिर्भर योजनेची स्थिती? कोरोना मुळे अस्थायी अर्थात फेरिवाल्यांचा व्यवसाय अस्थिर झाला आहे. त्यांच्यासाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेतंर्गत दहा हजार रुपये व्याज अनुदान तत्वावर देण्यात येत आहे. पण काहींचे आधारकार्ड अपडेट नसल्यामुळे योजनेतंर्गत योजनेतंर्गत नोंदणी करताना अनेकांना अडचणी जात होत्या. त्यामुळे अनेकांनी आता आधारकार्ड वरील मोबाईल नंबर अपडेट केल्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी दुर झाल्या असून जळगाव जामोद तालुक्यातही योजनेचा लाभ अनेक फेरिवाल्यांना मिळाला.
पुढील महिन्यात चालू आर्थिक वर्षाचे सहा महिने पूर्ण होतात. त्यानुषंगाने या सहा महिन्यात वार्षिक पत आराखड्याची किती उदिष्टपुर्ती झाली याचा आढावा घेवून कृषी, गृहनिर्माण, शिक्षण, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील एकंदर पतपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेवू. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत दुसºया फेजमध्ये थकबाकीदार असलेल्यांना पुनर्वित्त पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- नरेश हेडाऊ