तणनाशकाचा अति वापर धाेकादायकच!
मेहकर: साेयाबीन पिकात तण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढताे. त्यातच मजूरही मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आतापासूनच तणनाशकाची फवारणी सुरु केली आहे. ही फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पेरणी कशी करावी
सिंदखेड राजा: तालुक्यात २८ जून रोजी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांना पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली मदत
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बुलडाणा व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. १० जून रोजी ही मदत देण्यात आली आहे.
मलकापूर येथे शासकीय रक्तपेढी द्या
बुलडाणा : मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक ब्लड स्टाेरेज युनिट व शासकीय रक्तपेढीची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जाणीव फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात करण्यात आली आहे.
लर्निंग लायसन्स काढणाऱ्यांना मिळाला दिलासा
बुलडाणा : लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरी बसून ऑनलाईन परीक्षा देता येणार असून, लायसन्सची प्रिंट देखील ऑनलाईन काढता येणार आहे. आरटीओ विभागाने याबाबतचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
अतिवृष्टीग्रस्त ४८ शेतकरी मदतीपासून वंचित
साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा मंडळातील सवडद येथील ४८ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्याचा सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला हाेता ; परंतु अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही़
तलावांची पाहणी करण्याचे निर्देश
बुलडाणा : पावसाळ्यास प्रारंभ झाला असताना, जिल्ह्यातील पाझर तलाव, पाटबंधारे आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील तलावांची पाहणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी अनुषंगिक निर्देश देण्यात आले आहेत.
बुलडाण्यात स्वच्छता अभियान कागदावरच
बुलडाणा : स्वच्छता अभियान राबवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना लाखाेंचा निधी देण्यात येताे. मात्र, बुलडाणा शहरातील सार्वजनिक शाैचालयांची नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याचे चित्र आहे.
रुग्णवाहिका मिळाल्याने दिलासा
सुलतानपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाेन नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रुग्णवाहिका अभावी रुग्णांना पुढील उपचारासाठी नेण्यासाठी कसरत करावी लागत हाेती.
नगर संवर्ग अधिकारी जिल्हाध्यक्षपदी इंगळे
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी अमाेल इंगळे यांची, तर सचिवपदी श्रीकांत काेल्हे यांची बहुमताने निवड करण्यात आली.