शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 3:11 PM

बुलडाणा: पावसाळ््याच्या दोन महिने उलटल्यांतर बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्के पाऊस झाला असून संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावसाळ््याच्या दोन महिने उलटल्यांतर बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्के पाऊस झाला असून संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३ पैकी दहा तालुक्यात पावसाने ५० टक्क्यांच्यावर सरासरी ओलांडली असली तरी मराठवाड्यालगतच्या देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात मात्र अपेक्षीत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील स्थिती काहीशी चिंताजनक आहे.चार आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात ८.४ मिमी तर नांदुरा तालुक्यात ५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९३.५ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ही ५८.९३ टक्के आहे. यामध्ये प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात ८१.२१ टक्के, बुलडाणा तालुक्यात ७६.६८ टक्के, शेगाव तालुक्यात ७२.९५ टक्के पाऊस पडला आहे. जळगाव जामोद तालुक्यात ६९.२८ टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत गतवर्षीच्या दुष्काळाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तुलनेने चांगला पाऊस पडला असला तरी पलढग हा मध्यम प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांमध्ये मात्र अपेक्षीत असा जलसाठा झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जिल्ह्यात अद्यापही चांगल्या दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. राज्यात अन्यत्र मात्र पावसाने कहर केलेले असताना त्या तुलनेत गेल्या दोन दिवसात बुलडाण्यामध्ये पाऊस मात्र साधारण पडला आहे. 

देऊळगाव राजात कमी पाऊसजिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद या तीन तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक हजेरी लावली असली तरी देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर या तीन तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. एकट्या मराठवाड्याच्या लगत असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यात तर पावसाळ््यातील दोन महिन्यानंतरही पावसाची सरासरी ही ३४.९१ टक्केच आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस