क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लावणा येथे सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर येथील ग्रामपंचायत सदस्यांचा रुमाल. टोपी व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेवक गजानन पाटोळे म्हणाले की सावित्रीबाईच्या कार्य प्रेरणादायी असून, त्याच्या जयंतीदिनी मी कोणत्याच प्रकारचे व्यसन करणार नाही, दुसऱ्याला व्यसनमुक्तीपासून अलिप्त करील, गावात वादविवाद होऊ देणार नाही, गाव विकासासाठी सार्वजनिक प्रयत्न करेल, असा असा संकल्प करावा असे, त्यांनी सांगितले.
अविराेध विजयी उमेदवार भारत बोबडे, कमल शेखर गवळी, पूजा काशीनाथ बोडखे, रामभाऊ गायकवाड, सुशीला भारत बोबडे, सुभाष वानखेडे, संगीता पांडुरंग वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. सुधाकर वानखेडे, किसन टाले, बालाजी गवळी, साहेबराव बोबडे, विजय मेटांगळे, लक्ष्मण धोटे, दत्तात्रय पवार, कडू ढगे, आंबादास बोडखे, भीमराव वानखेडे, ज्ञानबा पवार,समाधान वानखेडे, गजानन डोईफोडे, राजू डोईफोडे, संतीराम काळे, विजय वानखेडे, दिनकर नरवाडे, रवि जाधव, जगन जयपूरे, योगेश वानखेडे, शेषराव वानखेडे, कैलास वानखेडे, बबन, अर्जून, संदीप वानखेडे,शरद अंभोरे, विष्णू बोडखे,अर्जुन पवार, संतोष मानवतकर, भानुदास खिल्लारे, अमृता गवई उपस्थित होते.