चिखली : वाढीव वीजबिलांची सक्तीची वसुली तत्काळ थांबवा व वीजबिल माफीसाठी बुलडाणा तालुका भाजपाच्यावतीने तालुकाध्यक्ष अॅड. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात धाड येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले.
आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनात व भाजपा तालुका अध्यक्ष अॅड. सुनील हासनराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवीदास पाटील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
महावितरणने सामान्यांची सक्तीची वीज वसुली व वीज कनेक्शन कापण्याचे जुलमी कारस्थान न थांबवल्यास येत्या काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन बुलडाणा तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने छेडण्यात येईल, असा इशारादेखील यावेळी अॅड. देशमुख यांनी दिला. दरम्यान, अभियंता कायंदे यांना निवेदन देण्यात आले. महावितरण कार्यालयाला टाळे ठोकताच जमलेल्या नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी बुलडाणा पं. स. सदस्य संदीप उगले पाटील, प्रकाश पडोळे, जितेंद्र जैन, किरण सरोदे, विशाल विसपुते, रमेश नरवाडे, अंकुश तायडे, हर्षल तायडे, विशाल तायडे, भगवान सिनकर, शरद देशमुख, सुनील घोडकी, अर्जुन लांडे, अनिल पालकर, संतोष पालकर, भागवत पालकर, योगेश जाधव, संजय बोराडे, अनिल पाटील, मंगेश जाधव, शुभम भुतेकर, सचिन पवार, अमोल बारवाल, ज्ञानेश्वर राजपूत, मयूर पडोळ, अनिल माळोदे, गजानन देशमुख, विशाल,देवेंद्र पायघन, वरुड ग्रा.प.सदस्य मंजितराव काळे, अनिल उबाळे, दिलीप पांडव, राहुल सोनुने, सिद्धेश्वर लडके, अनिल जाधव, सुनील जाधव, भीमराव पाटील, सुनील जाधव, लिंबाजी उबाळे, जगदेव पंडीत, अनिल गुळवे, शेखर बोराडे, अंबादास उबाळे, राहुल गुळवे, अनिल उबाळे, संतोष पडोळे, श्रीरंग पडोळे, जीवन चांदा, प्रमोद वाघ, भगवान पिपळे, सुनील भिवसनकर, कैलास वाघ, श्रीरंग एन्डोले, टीका खान, बंडू लकडे, राहुल सोनुने, माधवराव काळे, कमलाकरराव उबाळे, सुनील भिवसकर, गजानन मघाडे, सुरेश भिवसकर, राजू बुरजे आदी बुलडाणा तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.