बुलडाणा: शासनाचा विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नसल्याने खरे लाभार्थी त्यापासून वंचीत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांची गावोगावी माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करणाºया या चित्ररथाला जिल्हाधिकाºयांनी हिरवी झेंडी दाखविली आहे. जिल्ह्यात या चित्ररथाकडून योजनांचा प्रसार सध्या सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजनांची माहिती अनुसूचीत जाती, नवबौध्द या प्रवर्गातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी रमाई आवास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, सावित्रीबाई फूले शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, स्वयंसहाय्य्क बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना या व इतर अनेक योजनांची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाव्दारे जिल्ह्यातील अनेक गावांत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दूबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वºहाडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर आदी अधिकारी व कर्मचारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. योजनांच्या माहितीअभावी लाभार्थी वंचीतअनेक नागरिक शासनाच्या योजनांपासून अनभिज्ञ असतात. योजनांची माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभही मिळत नाही. योजनांपासून लाभार्थी वंचीत राहू नये, यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत चित्ररथ तयार करण्यात आला आहे. ज्या चित्ररथाद्वारे शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांच्या दारोदारी पोहचत आहे. परिणामी, योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:58 PM