शहरातील वेगवेगळ्या नऊ चौकात आयोजित केलेल्या या अभियानात ५० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सर्वत्र ओळख आहे. नैसर्गिक आपत्ती असो की सामाजिक सौहार्द प्रत्येक कार्यात संघ स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने मदतकार्य करण्यात अग्रेसर असतात. याच भूमिकेतून सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटकाळात स्वच्छता राखण्याविषयी आणि आवश्यक खबरदारी घेण्याबाबत लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य संघ स्वयंसेवक करत आहेत. या अंतर्गत रविवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती करणारे फलक हाती धरून नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्याचे संदेश दिले.
शहरातील विविध भागात राबवले अभियान
सिद्ध सायंस चौक, खामगाव चौफुली, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, बाबुलॉज चौक, चिंच परिसर आणि जाफ्राबाद रोड येथे संघ स्वयंसेवकांनी हे अभियान राबवले. या अभियानामध्ये नगर संघचालक शरद भाला, जिल्हा कार्यवाह राहुल निमावत, नगर कार्यवाह प्रल्हाद जोशी, ललितकुमार बारापात्रे, माधव कुळकर्णी, ओमप्रकाश गोंधणे, अरुण चव्हाण आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते.